breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर मार्गी ! लष्कराने दिली पालिकेला परवानगी

  • काम सुरू करण्यास लष्कर प्रशासनाची परवानगी
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी येथील मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यासंदर्भातील ८०८१ चौरस मीटर क्षेत्रावर काम सुरू करणेबाबतची परवानगी आज मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांनी महापालिकेला दिली आहे. भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या पुलामुळे पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी कायमची सुटणार असल्याचा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, निवडून आल्यानंतर १९/०५/२०१७ रोजी मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना पहिले पत्र देऊन याविषयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर २०/०९/२०१७ रोजी पुन्हा दुसरे पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. रेल्वे उड्डानपुलाचे काम तत्काळ मार्गी लागावे यासाठी स्वत: दिल्ली येथे जाऊन तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयाची पार्श्वभूमी त्यांना सांगण्यात आली होती.

कमांडट, स्टेशन हेडक्वार्टर, खडकी यांनी दिनांक २२/१०/२०१३ चे पत्रान्वये महापालिकेस संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या रस्त्यांमधील अ.नं. १५ – पिंपरी डेअरी फार्म रस्ता यासाठी र.रु. २,८६,८७,६५१/- ( ८०८१.०० चौ.मी. क्षेत्रासाठी ) इतकी रक्कम संरक्षण विभागाकडे जमा करनेबाबत कळविले होते. त्यानुसार महापालिकेने र.रु. २,८६,८७,६५१/- ( ८०८१.०० चौ.मी. क्षेत्रासाठी ) दिनांक २०/११/२०१३ रोजीच्या पत्रान्वये  संरक्षण विभागाकडे जमा केलेली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने संरक्षण विभागाचे सूचनेनुसार ११/०२/२०१५ पत्रान्वये ( अ.नं. १५ – पिंपरी डेअरी फार्म ) नवीन रस्ता आखणी प्रकरण संरक्षण विभागास सादर केलेले आहे.

या नवीन रस्त्याची आखणी प्रकरणानुसार वाढीव २७१७ चौ.मी.क्षेत्रासाठी संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या ३५५० प्रती चौ.मी.या जमिंदारानुसार वाढीव रक्कम महापालिका संरक्षण विभागास देण्यास तयार असून नवीन रस्ता आखणीनुसार महापालिकेने रेल्वे वरील उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. महापालिकेने संरक्षण विभागास अदा केलेल्या रक्कमेच्या क्षेत्रफळा इतक्या क्षेत्रावर उड्डाणपुलाचे काम सुरू करणेस संरक्षण विभागाने त्वरित मंजूरी द्यावी, अशी आग्रही मागणी निर्मला सीतारामन यांच्याकडे केली होती. यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिस पुणे व  मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांचेकडे १ जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून उड्डाणपूलाच्या कामास परवानगी देणेबाबत महापालिकेस परवानगी देण्यात यावी, यासाठी विनंती करण्यात आली होती.

या भागातील नागरिकांची समस्या सुटणार

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे उड्डानपुलाचे काम मार्गी लागण्यात यश आले आहे, असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले. सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच, या मंजुरीमुळे भुयारी मार्ग साई चौक, शगुन चौक पुलावरील वाहतुक कोंडी व पुणे मुंबई महामार्गाकडे ये-जा करण्यार्‍या नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडीची देखील समस्या सुटणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button