breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मी समाजाला शब्द दिलेला आहे..’; मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

मुंबई : राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यातील आंतरवाली सराटी गावात पोहचले आहे. यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. सरकारला तीन महिने दिले होते. आणखी चार दिवस देतो. पण, आरक्षणावर ठाम आहे, अशी भूमिका उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासमोर घेतली आहे.

समितीच्या अहवालासाठी आणखी वेळ लागत आहे. म्हणजे आपण आंदोलन मागे घेत नाही. सरकारला आणखी चार दिवसांचा वेळ दिला आहे. चार दिवसांत आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. कारण, हे आरक्षण आपल्याला कायमस्वरूपी मिळवायचं आहे, असं मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा – Pune : दहिहंडीनिमित्त पुण्यातील PMPML बस मार्गात बदल 

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात क्र. ८३ वरील कुणबी जाती-अंतर्गत “मराठा कुणबी वा कुणबी मराठा” ही जात समाविष्ट आहे. सदरील मराठा कुणबी वा कुणबी मराठी ही जात म्हणजेच मराठा जात आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. करिता मराठवाडा महसुली विभागातील मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button