breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपमध्ये खळबळ : महापौर, उपमहापौर देणार राजीनामे ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

एका तासात होणार प्रक्रीया पूर्ण
पिंपरी (महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवडचे महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला जाणार आहेत. तसे, आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तत्पुर्वी, उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा महापौर स्वीकारणार असून त्यानंतर महापौर काळजे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बदलाच्या हालचालींना काही दिवसांपासून वेग आला आहे. शहरातील राजकीय हालचाली बदलू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका तासाच्या आत महापौरांना राजीनामा देण्याचा मोबाईलद्वारे एसएमएस पाठविला आहे. तत्पुर्वी महापौर काळजे हे उपमहापौर मोरे यांचा राजीनामा घेणार आहेत. त्यानंतर महापौर काळजे स्वतः आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे राजीनामा देणार आहेत, अशी माहीती भाजपमधील खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, सध्यस्थितीत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना पदावरून हटविणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button