breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 5 नगरसेवक बाधित

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आज (दि.०६) रात्री रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. आजपर्यंत पाच नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचा-यांनाही विळखा घातला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठी मदत केली होती. जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. तसेच महापालिकेतील विविध बैठकांना देखील ते हजर राहत असत. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट  पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे,  चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना आणि चर्होलीतील राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button