पिंपरी चिंचवड महापालिकेचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यापुढे किमान एक-दोन महिना पुढील सर्व उद्घाटने, भूमिपुजन, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तसेच शहरातील विविध खासगी कार्यक्रम, सामुदायिक विवाह सोहळे पुढे ढकलण्यात यावेत, अशा सुचना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकार परिषदेत केल्या आहेत.
आयुक्त हर्डिकर म्हणाले की, यापुढे महापालिका एकही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येणारे खासगी कार्यक्रम पुढे ढकलावेत. कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत, त्यामुळे गर्दी झाल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माहिती देताना तीन पॉझिटीव्ह रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमधील होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 11 कायम आहे. आज (गुरुवारी) संध्याकाळी 5.30 वाजे पर्यंत पुणे शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी साांगितले.