breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही ऑनलाईन पेमेंट शक्य, पहा कसे ते…

कोरोनाच्या काळात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे अनेक ऑनलाईन पेंमेंट्स एप आणि मोबाईल वॉलेट्सद्वारे सोशल डिस्टसिंग पाळत आर्थिक व्यवहार सध्या करत आहेत . आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देखील युजर्स ऑनलाईन पेमेंट करु शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्समध्ये युपीआय (UPI) आधारीत असलेल्या पेमेंट मेथडचा वापर केला गेला आहे. याचा वापर करुन युपीआय लिंक असलेल्या बँक अकाऊंट्समधून पैशांची देवाण घेवाण करु शकता. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट ऑप्शन हा अॅनरॉईड आणि आयोएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. , मात्र सध्या केवळ मर्यादीत युजर्सच त्याचा वापर करु शकतात. आयसीआयसी, एचडीएफसी , एक्सिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपचे पेमेंट फिचरद्वारे व्यवहार करु शकतात.

तर व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचा सेटअप कसा करता येईल ?

* व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन सेटिंग मेन्यूमध्ये जा आणि तेथील पेमेंट्स ऑप्शनवर क्लिक करा.

त्यामध्ये Add New Account वर क्लिक करा.

* त्यानंतर अटी आणि शर्थी म्हणजे Terms and Conditions वाचून एक्सेप्ट करा.

* युपीआय लिकींग प्रोसेस करण्यासाठी एसएमएस द्वारे तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करा.

* मग तुमचे युपीआय लिंक असलेलं बँक अकाऊंट सिलेक्ट करा. अकाऊंट लिंक झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर ‘UPI Setup Complete’असा मेसेज दिसेल.

सेटअप झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पैसे कसे पाठवाल?

* ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे चॅट ओपन करा.

*Attachments ऑप्शन्समधून पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.

* अमाऊंट टाईप करुन नेक्स्ट वर क्लिक करा.

* तुमचा युपीआय पीन एंटर करुन पैसे सेंड करा.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट द्वारे पैसे कसे स्वीकार करू शकाल ?

* ज्या व्यक्तीकडून पैसे स्वीकारायचे आहेत. त्याला रिक्वेस्ट पाठवा. पेमेंट स्वीकारण्यासाठी रिक्वेस्ट एक्सेप्ट करणे आवश्यक आहे.

* समोरील व्यक्तीने रिक्वेस्ट एक्सेप्ट करुन पैसे पाठवल्यास तुम्हाला मेसेज येईल. अकाऊंट बॅलन्स चेक करुन तुम्ही पैसे आले की नाही हे तपासू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हीस भारतात टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली आहे. सध्या देशातील फक्त एक कोटी युजर्स सध्या या सेवेचा लाभ घेऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. मात्र, केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया यांची परवानगी न मिळाल्यामुळे भारतात ही सेवा सुरु होऊ शकली नव्हती. मात्र आता काही बाबी अपडेट केल्यानंतर भारतात ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button