breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीमा सुकाळे तर सचिवपदी मुकुंद वाखारे निवड

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सविता अनिल सुकाळे यांची सर्वानुते निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या शंकर अण्णा गावडे सभागृहात शुक्रवारी (दि. 21) निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहकार उपनिबंधक, सहकारी संस्था अधिकारी सचिन सरसमकर यांनी काम पाहिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत दत्तात्रय विठ्ठल ढगे (उपाध्यक्ष), महादेव तुकाराम बोत्रे (खजिनदार) यांचीही निवड करण्यात आली. या वेळी मावळते अध्यक्ष आबा गोरे, संचालक महाद्रंग वाघेरे, संजय कुटे, मनोज माछरे, चारूशीला जोशी, दिलीप गुंजाळ, सतीश गव्हाणे, राजाराम चिंचवडे, रमेश चोरघे, भगवान मोरे, नथा मातेरे, यशवंत देसाई, अंबर चिंचवडे हे उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करताना महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणाले की, पतसंस्थेने नुकतेच 150 कोटींचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. भविष्यात सभासदांना मुदतकर्ज 10 लाख रुपयांऐवजी 15 लाख रुपये व अल्पमुदत कर्ज 20 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये करण्याचे नियोजन आहे. सलग तीन वर्ष ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविणारी ही संस्था आहे. थकीत कर्जाचे प्रमाण नगण्य आहे.
स्वागत मनोज माछरे, सुत्रसंचालन आबा गोरे आणि आभार चारुशिला जोशी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button