breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाचा गौरव

कोरोना संसर्ग झालेल्या पोलीस रुग्णांना सेवा दिल्याबद्दल केला सन्मान

पिंपरी | प्रतिनिधी
डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी पुणे येथे (दि १३) रोजी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा गौरव करण्यात आला. कोरोना तपासणी व संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा आणि सहकार्य केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले.

या वेळी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, सह पोलीस निरीक्षक अनिल लोहार या वेळी उपस्थित होते. तसेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ एच एच चव्हाण, संचालक, सुरक्षा विभाग  श्री. बरकत मुजावर, आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावात रुग्णालय कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची  कोरोना तपासणी, कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांवर आंतररुग्ण विभाग उपचार आदींची दखल घेऊन आयुक्तालयाने गौरव केले आणि आज रोजी या आयुक्तालयातील शेवटचा पोलीस कर्मचारी कोरोना मुक्त झाला. अशारीतीने ४०० हुन अधिक कोरोना तपासणी तर २०० हुन अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले.  रुग्णालयांच्यावतीने डॉ. यशराज पाटील यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. “आज वर केलेल्या कामाबद्दल पोलीस प्रशासनाने कौतुकाची थाप दिल्यामुळे पुढच्या कामाला अधिकच बळ मिळाले आहे”. असे मत डॉ यशराज पाटील यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button