breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यमुनानगरमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

पिंपरी – यमुनानगर मधील एका इमारतीमध्ये युवकाचा मृतदेह आढळला. हा प्रकार आज (बुधवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला.

श्रीराम मनोहर ढगे (35, श्री सह्याद्री, यमुनानगर, निगडी)  असे मृतदेह आढळलेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम मागील दहा वर्षांपूर्वी यमुनानगर मधील श्री सह्याद्री हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायला आले होते. त्यांचे पुण्यामध्ये एक घर आहे. पुण्यातील घरी त्यांचे आई-वडील राहतात. श्रीराम यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत वारंवार भांडण होत होते. वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नी आठ महिन्यांपूर्वी सहा वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. श्रीराम एकटेच यमुनानगर मधील घरी राहत होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी यमुनानगर मधील घरी येऊन बघितले असता, श्रीराम यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. मागील चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button