breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

४०० वर्षांचा सारंगखेड्याचा यात्रोत्सव, घोडेबाजार रद्द; ५० कोटींची उलाढाल थांबली

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी दत्त जयंतीला भरणारा घोडेबाजार सुप्रसिद्ध आहे. सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथे यात्रोत्सवानिमित्त घोडेबाजार भरवण्याची परंपरा आहे. मात्र कोरोना महामारीमुळे यंदाचा यात्रोत्सवच रद्द झाल्याने घोडेबाजारही भरणार नाही. यामुळे सुमारे ५० कोटींची उलाढाल थांबली आहे. 

राजस्थानातील पुष्कर येथील यात्रोत्सवानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार म्हणून हा बाजार मानला जातो. घोडेबाजाराची ख्याती जगभर व्हावी, यासाठी आयोजकांकडून येथे दरवर्षी चेतक फेस्टिव्हल आयोजित केला जातो. सारंगखेडा येथील यात्रोत्सवात उमदे घोडे विक्रीसाठी येतात.  या घोडेबाजारातून सरासरी ८ कोटींपर्यंत उलाढाल होत होती.

शेकडोंच्या संख्येने अश्वप्रेमी घोडेबाजाराला भेट देत असतात. घोडेबाजारावर घोड्यांसाठी लागणारा साज, विविध गरजेच्या वस्तू, चारा, बैलगाडे, शेती साहित्य, शेती औजारे खाद्य खरेदी-विक्रीतून चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button