breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये वा-यासह पावसाची सुरुवात, शहरवासियांमध्ये समाधान

पिंपरी, (महाईन्यूज) – हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये आज पावसापूर्वीच्या वादळाला सुरूवात झाली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वारा सुटल्याने सर्वत्र धुलीकण पसरले होते. त्यानंतर रिमझीम पावसाला सुरूवात झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्याची सुरूवात झाल्याचे समाधान मिळाले.

  • रणरणत्या उन्हामुळे जीवाची काहिली झाली असताना कधी एकदाचा पावसाळा सुरू होतो, याची प्रतिक्षा पिंपरी-चिंचवडकरांना लागली होती. हवामान खात्यानेही 6 जूनपूर्वी पावसासह वादळ वारा सुटणार असल्याचा अंदाज गेल्या आठवड्यात वर्तविला होता. त्यातच दरवर्षीच्या 6 जूनला मृग नक्षत्र निघते. त्यामुळे सर्वजन पावसाची वाट पाहू लागले होते.

आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले होते. त्यानंतर जोरदार वा-याची सुरूवात झाली. वारा सुटल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये धुलीकण पसरले होते. धुलीकणांमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार, पादचारी यांना समोरचे काही दिसेनासे झाले होते. तब्बल तासभर वा-याचा लपंडाव सुरू होता. त्यानंतर हळूच रिमझीम पावसाची सुरूवात झाली. पिंपरी-चिंचवडच्या अखंड भागावर आगमणाच्या पावसाने बरसात केली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हायशे वाटले. पावसाचे आगमण झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांना समाधान वाटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button