breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मेट्रो-३चे भुयार मिठी नदीखाली

५ फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात

कुलाबा-वांद्रे-सिप्झ (मेट्रो-३) या संपूर्णपणे जमिनीखाली असलेल्या भुयारी मेट्रो मार्गिकेमधील मिठी नदीखालून जाणाऱ्या भुयाराचे काम ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मेट्रो-३च्या पहिल्या टप्प्यातील वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शन उभारण्याचे काम याअंतर्गत करण्यात येणार आहे. या ठिकाणी न्यू ऑस्ट्रियन टेक्नोलॉजी मेथडच्या (नॅटम) आधारे खणलेले देशातील पहिले नदीखालचे स्वतंत्र भुयार असेल.

मुंबईत सध्या मेट्रो-३ या भुयारी मार्गाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील एकूण १७.५ किलोमीटरचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा कुलाबा ते वांद्रे हा पहिला टप्पा डिसेंबर २०२१ मध्ये कार्यान्वित होणार आहे. यातील मिठी नदीखालील भुयार निर्मितीच्या आव्हानात्मक कामाला फेब्रुवारीत सुरुवात होईल. धारावी-बीकेसी यांना जोडण्यासाठी मिठी नदीखालून तीन भुयारे खोदण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे जंक्शन बीकेसी येथे उभारण्यात येणार आहे. तिथे चार फलाट असतील. त्यामुळे येथे दोन्ही दिशेला गाडय़ा परत पाठविण्यासाठी मिठी नदीखाली १५३ मीटरचे स्वतंत्र भुयार खोदण्यात येणार आहे. तीनपैकी दोन भुयारे ‘टनल बोअिरग मशीन’च्या (टीबीएम) आधारे खोदण्यात येतील, तर एक स्वतंत्र भुयार ‘नॅटम’ पद्धतीने खोदण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो-३ चे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी दिली. ‘नॅटम’ पद्धतीमध्ये टप्प्याटप्प्याने भुयार खोदले जाते. त्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नॅटमचा वापर का?

कफ परेड आणि बीकेसी ही स्थानके जंक्शन असतील. येथून गाडय़ा पुन्हा वळवण्यासाठी अधिक फलाट बांधण्यात येणार आहेत. टीबीएमच्या आधारे भुयारीकरण करताना दुसऱ्या बाजूने यंत्र बाहेर काढण्यात येते. मात्र गाडय़ा वळवण्यासाठी खोदण्यात येणारे भुयार हे एकमुखी असते. अशा भुयारातून टीबीएम काढणे शक्य नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी नॅटम पद्धतीने भुयार खणण्यात येईल.

मिठी नदीखालून जाणाऱ्या तीन भुयारांचे काम आव्हानात्मक आहे. नॅटम पद्धतीच्या आधारे खोदण्यात येणाऱ्या भुयाराचे काम ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. हे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल.     – एस. के. गुप्ता, प्रकल्प संचालक, एमएमआरसी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button