breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपात लागू होणार ? सर्वपक्षीय बैठकीत उद्या निर्णय

आयुक्तांच्या दालनात महापाैरांनी बोलविली बैठक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात दहा टक्के पाणी कपात करायची की एकदिवसाआड पाणी पुरवठा करायचा, याबाबत महापालिकेच्या सर्वपक्षीय प्रमुख पदाधिका-यांची उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता आयुक्तांच्या दालनात महापाैर राहूल जाधव यांनी बैठक बोलविली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात करण्याचे निश्चित झाले असून यापुढे शहरवासियांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.   

पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पदाधिकारी मागील आठवड्यात स्पेनमधील बर्सिलोना परदेशी दौऱ्यात गेले होते. त्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरातील पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र,  हे सर्व पदाधिकारी आता शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे पाणी कपातीवर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली आहे.

पवना धरणातून महापालिका दररोज 460 ते 480 एमएलडी पाण्याचा उपसा करीत होते. सद्य:स्थितीत महापालिका मंजुरीपेक्षा अधिक पाणी उचलत होते.  मात्र, परतीचा पाऊस सरासरी न झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाऊ नये, याकरिता आतापासूनच खबरदारी घेण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने अवलंबले आहे. तसेच पवना धरणातील पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी महापालिकेने दिवसाला 440 एमएलडी एवढाच मर्यादित पाणी उपसा करण्याची सूचना या विभागाने केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पवना धरणातील पाणी उपशाबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याच्या काटसकरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले आहे.

दरम्यान, रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून अधिक विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणी साठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणी वापर 440 एमएलडी मर्यादीत ठेवण्याबाबत नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. या पत्राचा संदर्भ देत, शहरात पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button