breaking-newsमहाराष्ट्र

हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठिंबा

कन्नड मतदारसंघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी शिवसेना उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली. कन्नडचे माजी आमदार आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात उदयसिंह राजपूत अशी लढत होईल, असे चित्र होते, मात्र, किशोर पवार यांच्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. त्यातच आता हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं आता हर्षवर्धन जाधव यांचं पारडं जड झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. एमआयएमच्या पाठिंब्यामुळं त्यांचं पारड जड झाल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button