breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांनी केला ६३ हजारांचा टप्पा पार

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोनाचा विळखा वाढत असून, रविवारी दिवसभरात १०२८ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,६२२ झाली. महापालिका हद्दीतील ५०,०४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, कोरोना रुग्णांनी ६३ हजारांचा टप्पा पार केला असून चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. असे असले तरी आजअखेर ५३१३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत २६२०८० संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून त्यातील २५१५९० रुग्णांना आजअखेर घरी सोडण्यात आले आहे. तसेच १९५०४२ रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button