breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी कपात रद्द करा, टॅंकर लाॅबी बंद करा, महापालिकेवर काॅंग्रेसचा धडक मोर्चा

पिंपरी |महाईन्यूज|

नही चलेंगी, नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी, दिवसाआड पाणी कपात रद्द करा, टॅंकर लाॅबी बंद करा, अशा घोषणा देत पिंपरी चिंचवड शहर काॅंग्रेसच्या वतीने आज (सोमवार) महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी शहर काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरवासियांवर अन्यायकारक दिवसाआड पाणी कपात लादली आहे. पवना धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. पुढच्या वर्षीच्या आक्टोबर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तरीही सत्ताधारी भाजप आणि पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणा व नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासियांवर पाणी कपात लादण्यात आलेली आहे.

ही दिवसाआड पाणी कपात तातडीने रद्द करा, पाणी पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी शहर काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button