breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पथविक्रेत्यांना अर्थसहाय करण्यासाठी ”प्रधानमंत्री पथविक्रेता (फेरीवाला) आत्मनिर्भर स्वनिधी योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फेरीवाले व्यावसायिकांना व्यावसायासाठी वार्षिक कर्ज दिले जाणार आहे. या योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पथविक्रेता (फेरीवाले) आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची उद्दीष्टे
1) पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल रक्कम रू. १०,००० कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे.
2) नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे.
3) डिजीटल व्यवहारात प्रोत्साहन देणे.

लाभार्थी पात्रता निकष
1) दिनांक २४ मार्च २०२० वा त्यापूर्वीचे पथ विक्रेते.
2) महानगरपालिकेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र असलेले पथ विक्रेते. (Category A)
3) महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतू, त्यांनी विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र दिले गेले नाही असे पथ विक्रेते. (Category B)
4) महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणांत जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर
विक्री सुरू केली आहे आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे असे पथविक्रेते.(Category C)
5) आसपासच्या भागातील पथविक्रेते महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यांना
महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते.
(Category D)

लाभाचा तपशील
1) नगरविक्रेता १ वर्षाच्या परतफेड मुदतीसह रू.१०,००० पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.
2) सदर कर्जावर RBI च्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहील.
3) विहित कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान मिळवण्यास पात्र.
4) डिजीटल माध्यमातून व्यवहार केल्यास कॅशबॅक सुविधेस पात्र.
पथविक्रेता कर्ज अर्ज पद्धत
1) http//:pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटद्वारे अर्ज करणे.
2) सीएफसी केंद्र यांचे द्वारे अर्ज करू शकतात.
3) आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक.
4) मनपाने दिलेले पथविक्रेता प्रमाणपत्र.
5) निवडणूक ओळखपत्र.

महानगरपालिका हद्दतील जास्तीत जास्त फेरीवाले आणि पथविक्रेते यांनी त्यांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणाच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणेकामी नागरी सुविधा केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन ऐवले यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button