breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडकरांवर दिवसाआड पाणी पुरवठ्याचा अन्याय; विरोधक अद्याप थंड!

पाणी पुरवठा सुरळीत करण्यास आयुक्त श्रावण हर्डिकरांचा ठाम नकार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

दररोज पाणी पुरवठा करण्यास 30 एमएलडी जादा पाण्याची गरज आहे. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहील, असे सुतवाच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलतान केले. दरम्यान, दिवसाआड पाणी पुरवठ्यावर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे अद्यापही गप्प राहिले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात समसमान पाणी पुरवठा करण्यास आणि पाणी पुरवठा विभागाची अनुंषगिक कामे करण्याकरिता पालिका आयुक्तांनी 25 नोव्हेंबर 2019 रोजी दोन महिन्यांसाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला होता. त्यानंतर आता 25 जानेवारी 2020 रोजी दोन महिने पुर्ण होवूनही शहरवासियांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यास आयुक्त हे राजी नाहीत.

महापालिका आयुक्तांनी अद्याप पाणी पुरवठा विभागाचा दोन महिन्यांतील कामकाजाचा आढावा घेतलेला नाही. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोन महिन्यात कोणती सुसुत्रता आणली हे अजूनही सांगितले नाही.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधक अजूनही थंड आहेत. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना दिवसाआड पाणी देवून अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button