ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबमध्ये मान मंत्रिमंडळाचा शपथविधी; तरुणांना जास्त संधी

चंदिगड  | पंजाब विधानसभा निवडणुकीत शानदार यश मिळाल्यानंतर आम आदमीचे भगवंत मान यांनी १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळात १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे मान यांच्या मंत्रीमंडळात तरुणांचाच भरणा आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एका महिला मंत्र्यांचाही समावेश आहे.

मान यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा आज शपथविधी झाला. त्यात हरपल सिंग चीमा यांच्याबरोबरच हरभजन सिंग इतो, लाल सिंग कटरौचक, विजय सिंघला, गुरमीत सिंग मीत हायर, कुलदीप सिंग धालीवाल, ब्रह्म शंकर, लालजीत सिंग भुल्लर आणि हरज्योत सिंग बैन्सी यांचा समावेश आहे. हरपाल सिंग चीमा २०१७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. ते ४७ वर्षांचे आहेत. हरज्योत बैन्स मान यांच्या मंत्रिमंडळात एकमेव महिला कॅबिनेट मंत्री आहेत. त्या डोळ्याच्या डॉक्टर असून ४६ वर्षांच्या आहेत. मलोट विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button