ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साठेखत, कुलमुखत्यारपत्र, ताबापावती करूनही कोट्यावधींची फसवणूक, न्यायालयात दावा दाखल

तळेगाव | जमिनीच्या विक्रीचे साठेखत, कुलमुखत्यारपत्र, ताबापावती व नोटरीसमक्ष सह्या करून देखील कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप करत, याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालयात 21 जणांविरोधात दावा दाखल करण्यात आला आहे.सुनील साळवे आणि भागवत चौधरी यांनी हा दावा दाखल केला आहे.निवृत्ती ऊर्फ फकिरा सोपान बनसोडे, बाळू सोपान बनसोडे, अंकुश मनोहर बनसोडे, अमोल मनोहर बनसोडे, हौसाबाई मनोहर बनसोडे, प्रकाश संतू बनसोडे, अतुल रमेश बनसोडे, नितीन रमेश बनसोडे, विमल रमेश बनसोडे, सुरेश धोंडीबा बनसोडे, राजू धोंडीबा बनसोडे, शिवाजी बळवंत बनसोडे, वैभव संभाजी बनसोडे, सूरज संभाजी बनसोडे, दत्तू येदू बनसोडे, विजय येदू बनसोडे, बाळू राघू बनसोडे, राजेश नंदू बनसो़डे, सुमित्रा नंदू बनसोडे, बाळू ज्योतीबा बनसोडे, सिद्धार्थ मोतीराम बनसोडे यांच्या विरोधात फौजदारी खटला क्रमांक 575/2021 वडगाव मावळ कोर्टात दावा दाखल करण्यात आला आहे.

दावा दाखल केलेल्या 21 जणांची मावळ तालुक्यातील तळेगाव, आंबी (एमआयडीसी) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. एमआयडीसीने 2015 मध्ये ही जमीन आरक्षित केली होती. तरीही, सन 2017 मध्ये या जमिनीची मितल दोशी आणि शालीभद्र शाह यांना विक्री केली. आरक्षित जमिनीची विक्री करुन फकिरा आणि बाळू यांनी शासनाचीच फसवणूक केली. दरम्यान, शेतक-यांनी कुलमुखत्यारपत्र साळवे आणि चौधरी यांना दिले. उक्ती रक्कम 50 लाख रुपये ठरले होते. त्यानुसार खरेदी व्यवहाराचे साठेखत, कुलमुखत्यारपत्र, ताबापावती व नोटरीसमक्ष लिहून देण्यात आली. त्यासाठी 40 हजार रूपये विसार देखील देण्यात आला. आंबीगाव तलाठी यांच्याकडे कागदपत्रे जमा करून 21 जणांची वारस नोंद आम्ही करून घेतली, असे साळवे यांनी दाव्यात म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमिनीचे पैसे जमा झाले होते. हे पैसे मिळण्याबाबत देखील सर्व आवश्यक बाबींची पूर्तता आम्ही केली. शेतक-यांच्या नावावर ते पेसै जमा झाले. साठेखत व कुलमुखत्यारपत्र अटी व शर्तीप्रमाणे साळवे व चौधरी यांच्या खात्यात शेतक-यांनी (बनसोडे) संमतीने RTGS पद्धतीने पैसे जमा केले. त्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे संमजपणाने शहा व दोशी यांना परत देण्यासाठी 1 कोटी 14 लाख रूपये शेतक-यांना दिले, असे दाव्यात म्हटले आहे.

त्यानंतर, उक्ती रकमेतील शिल्लक 49 लाख 60 रूपये शेतक-यांना आम्ही दिले. मात्र, हे पैसे देऊन देखील शेतक-यांनी अधिकचे देण्यासाठी आमच्यामागे तगादा लावला. याबाबत शेतक-यांविरोधात तक्रार देण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गेलो असता, तक्रार घेतली नाही. त्यामुळे शेतक-यांनी साठेखत, कुलमुख्यत्यारपत्राचे उल्लघंन केल्याने त्यांच्या विरोधात वडगाव मावळ न्यायालयात फसवणुकीचा दावा दाखल केला असल्याचे साळवे यांनी सांगितले.

दाव्यातील आरोपी हे वेगवगळ्या संघटनांकडे व राजकीय पक्षांकडे जाऊन आपली बदनामी करत आहेत. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचत आहे. आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्व आरोपी तसेच संबधित संघटना व राजकीय पक्ष जबाबदार राहतील, अशा आशयाचे निवेदन साळवी यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button