breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पालिकेच्या संकेतस्थळावरून महापौरांचे छायाचित्र गायब

मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावरून गेल्या काही दिवसांपासून गायब झालेले आहे. आचारसंहिता संपून चार ते पाच दिवस उलटून गेल्यानंतरही महापौरांचा फोटो लावण्याची पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला आठवण झालेली नाही.

पालिकेच्या संकेतस्थळावर पालिका आयुक्त आणि महापौरांचे छायाचित्र नेहमी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे छायाचित्र संकेतस्थळावरून गायब झाले आहे. माजी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त आयुक्त परदेशी यांचे छायाचित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तत्परता माहिती तंत्रज्ञान विभागाने दाखवली होती. मात्र महापौरांचे छायाचित्र गेल्या कित्येक दिवसांपासून संकेतस्थळावर दिसत नाही.

या संकेतस्थळावर मध्यभागी पालिका मुख्यालयाचे छायाचित्र आहे. त्याच्या बाजूला एका स्लाइडवर आयुक्तांचे छायाचित्र असते तर दुसऱ्या स्लाइडवर महापौरांचा फोटो असतो. मात्र निवडणुकीच्या काळात काढून टाकलेले त्यांचे छायाचित्र अद्याप लावलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button