breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

पार्थ पवारांच्या बोलण्याला कोणीही कवडीमात्र किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत – शरद पवार

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आपल्या नातावाने केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे’ अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

तसंच ‘सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50 वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तसंच ‘ सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते.’ असंही पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button