breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात कृत्रिम पाणी टंचाई ; आयुक्तांच्या घरावर महिलाचा हंडामोर्चा काढणार

भाजप महिला नगरसेविकेचा आयुक्तांना इशारा 

कार्यकारी अभियंता रामदास तांबेच्या बदलीची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात महापालिका पाणी पुरवठा अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शहरात सर्वत्र नागरिकांची सुरळीत व उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज सत्ताधारी नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयासह घरासमोर बोंबाबोब सुरु आहे. याबाबत पाणी पुरवठा कार्यकारी अभियंते हे पदाधिकारी आणि नगरसेवकांना गुळगुळीत उत्तरे देवून सर्वांना वेड्यात काढण्याचा प्रकार करु लागले आहेत. येत्या आठ दिवसात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत आणि उच्च दाबाने न केल्यास आयुक्तांच्या घरावर हंडामोर्चा काढणार असल्याचा इशारा भाजपच्या महिला नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिला आहे. 

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या दालनात आज (शनिवारी) सायंकाळी 5 वाजता शहरातील पाणी टंचाईबाबत बैठक पार पडली. यावेळी महापाैर राहूल जाधव,  उपमहापाैर सचिन चिंचवडे, सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांच्यासह भाजप विविध समित्यांचे सभापती, प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते.

शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढल्याने तब्बल 15 हजाराहून अधिक नळजोड़णी बोगस झालेली आहे. त्यावर महासभेने धोरण बनवूनही पाणी पुरवठा विभागाने अधिकृत नळजोडणी अद्याप केलेली नाही. नागरिकांच्या नळजोडणीतून आणि पाण्याच्या पाईपमधून पाण्याची गळतीचे प्रमाण वाढलेले आहे. कित्येक आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या घरामध्ये किमान एक ते दोन नळजोडणी अनधिकृतपणे केलेली आहे. अनधिकृत बांधकामाना पिण्याचे पाणी वापरले जात आहे.

तसेच पाणी पुरवठा विभागातील काही अधिका-यांनी पाणी टंचाईवर पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतेय, धरणातील पाणी आटल्याने त्यातील गाळ पाईपमध्ये गेल्याने गढूळ पाणी पुरवठा होतोय, रावेतच्या बंधा-याची उंची कमी असल्याने पाणी साठा जास्त होत नाही, त्यातील लाखो लिटर पाण्याची बंधा-यातून गळती होतेय, यासह अनेक अडीअडचणीमुळे शहरात पाणी टंचाई जाणवू लागल्याचे अधिकारी बोलू लागले आहेत.

दरम्यान, पवना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन शहरात सुरळीत व उच्च दाबाने पाणी पुरवठा करा, नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी येवू नयेत, याविषयी अधिका-यांनी दक्षता घ्यावी, येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, त्यानंतर पाण्याच्या तक्रारी आल्यास प्रत्येक प्रभागातील महिलांना घेवून आयुक्तांच्या घरावर हंडामोर्चा काढण्यात येईल, तसेच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदाब तांबे यांची तात्काळ अन्य विभागात बदली करावी, अशीही मागणी भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे बैठकीत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button