breaking-newsमनोरंजन
सामुदायिक विवाह सोहळ्यात ‘आज्या अन् शितलीनं बांधली लगीनगाठ’
‘लागीरं झालं जी’ या मालिकेत अजिंक्य आणि शितल यांच्या लग्नाचे चित्रीकरण नुकतेच साताऱ्यात पार पडले. सामुदायिक विवाहसोहळ्यात शितल आणि अजिंक्य यांचे लग्न लागले. एखाद्या मालिकेत हीरो-हीरोईनचे सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न लागल्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. दोघांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटोज समोर आले आहेत. येत्या ३० मे रोजी दोघांचा लग्नसोहळा प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळणार आहे.