breaking-newsराष्ट्रिय

१० आयआयटीमधील २७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, माहिती अधिकारातून उघड

महाईन्यूज | पुणे

गेल्या पाच वर्षांत देशभरातील १० भारतीय तंत्रज्ञान संस्थांतील (आयआयटी) २७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे माहिती अधिकार कायद्यातील विचारणेच्या उत्तरातून उघड झालेले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आयआयटी मद्रास या यादीत पहिल्या क्रमांकावर असून, तेथील ७ विद्यार्थ्यांनी पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या आहेत.२०१४ ते २०१९ या कालावधीत आयआयटी मद्रासमधील ७, आयआयटी खडगपूरमधील ५, तर आयआयटी दिल्ली व आयआयटी हैदराबादमधील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या विचारणेच्या उत्तरात मंत्रालयाने २ डिसेंबरला कळवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button