breaking-newsमनोरंजन

लग्नाच्या वाढदिवशी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचले दीपवीर

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. गतवर्षी 14 नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले होते. दीपवीरच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दोघांनी तिरूपतीचे दर्शन घेऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आज सकाळी दीपवीर तिरूपती  बालाजी मंदिरात पोहोचले. यावेळी रणवीर व दीपिका दोघांचेही कुटुंब त्यांच्यासोबत होते. यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये दीपिका व रणवीर पुन्हा एकदा नवविवाहित दांम्पत्याच्या लूकमध्ये दिसले.  लाल रंगाची भरजरी साडी, सोन्याचे दागिणे, भांगात कुंकू असा तिचा लूक होता. तर रणवीरने आॅफ व्हाईट कुर्ता पायजामा आणि सोबत गोल्डन एम्बरॉयडरीचा जॅकेट घातले होते. यावर सोनेरी किनार असलेली शाल त्याने पांघरली होती. रणवीर सिंगची शाल आणि दीपिकाची साडी परफेक्ट मॅच दिसत होते.

https://www.instagram.com/p/B41VP6tBSWn/?utm_source=ig_embed

तिरूपती बालाजीच्या दर्शनानंतर दीपवीर पद्मावती मंदिराचे दर्शन घेणार आहे. यानंतर 15 नोव्हेंबरला म्हणजे उद्या हे कपल अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट देणार आहे.  त्याच दिवशी, म्हणजे 15 नोव्हेंबरला ते आपल्या कुटूंबासह मुंबईला येण्यासाठी रवाना होतील. 


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button