breaking-newsराष्ट्रिय

पाच वर्षांत पहिल्यांदाच पतंजलीच्या विक्रीत घट

पतंजली आयुर्वेदच्या विक्रीला मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच धक्का बसला आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि सदोष वितरण व्यवस्थेमुळे कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. केअर रेटिंग्जच्या एका अहवालाच्या मते, कंपनीचा ग्राहक वस्तू महसूल आर्थिक वर्षाअखेर मार्च २०१८ मध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरणीसह ८१४८ कोटींवर पोहोचला होता.

अहवालात म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदच्या विक्रीत घसरणीमागचे मुख्य कारण हे जीएसटीच्या अंमलबजावणी आलेली अडचण आणि सदोष वितरण व्यवस्था आहे. कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी कंपनीची उलाढाल येत्या ३ ते ५ वर्षांत २० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पतंजलीचा महसूल २०१६ मध्ये १० हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे २०१२ मध्ये हा ५०० कोटी रुपयांहून कमी होता.

पतंजलीकडे स्वत:चे चिकित्सालय असल्यामुळे सुरुवातीला याची लोकप्रियता मोठ्या वेगाने वाढली होती. परंतु, पतंजलीची उत्पादने किराणा दुकानात उपलब्ध होऊ लागल्याने कंपनीच्या चिकित्सालयांवर प्रभाव पडू लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button