breaking-newsराष्ट्रिय

ईव्हीएमची पूजा करणाऱ्या भाजपा मंत्र्याला निवडणूक आयोगाची नोटीस

छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्याला निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. छत्तीसगडमधील भाजपाचे विद्यमान आमदार आणि मंत्री दयाल दास बघेल यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

‘मतदानापूर्वी ईव्हीएमची पूजा करतानाची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी भाजपाचे उमेदवार बघेल यांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल’, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुब्रत साहू यांनी दिली.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाचे विद्यमान आमदार आणि मंत्री दयाल दास बघेल यांच्याकडून एक अजब प्रकार पाहायला मिळाला होता. शेवटच्या टप्प्यात मतदान करण्यासाठी आले असता त्यांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची चक्क विधीवत पूजा केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पूजा झाल्यानंतर नारळ फोडलं आणि त्यानंतरच आपलं मत नोंदवलं होतं. दयाल दास बघेल यांच्याकडे राज्याचे सहकारीता आणि सांस्कृतिक खाते आहे. ते नवागड विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवत आहेत. हा सगळा प्रकार एका व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button