breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

थायलंडमधील गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका – कोचची कमाल

चियांग राय (थायलॅंड) – थायलंडमधील गुहेत अडकलेल्या 12 फुटबॉलपटू आणि एका कोचपैकी सर्वच्या सर्व 12 मुलांची आणि कोचचीही आज सुटका करण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी मिळून एकूण 8 जणांची सुटका करण्यात आली होती. आज आणखी 5 जणांना गुहेतून बाहेर काढण्यात आले आहे. 50 परदेशी आणि 40 स्थानिक मिळून एकूण 90 पाणबुडे या सुटका मोहिमेत सामील झालेले आहेत.

एलॉन मस्क यांनी पाठवलेली बेबी पाणबुडी ही गुहेत पोहचली. 23 जून रोजी गुहेत अडकलेल्या 12 खेळाडूंची आणि त्यांच्या कोच ची सुटका करण्यासाठी पहिले नऊ दिवस कोणीही पोहचले नव्हते. अशा अवस्थेत त्यांच्या कोचने त्यांना धीर दिला. अगदी मर्यादित अन्न आणि पाणी असताना त्याने या मुलांना आपल्या वाट्याचे अन्नही दिल्याची माहिती गुहेतून बाहेर मुलांनीच दिली आहे.

मुलांचे कोच इकापोल चांटावांग हे तीन वर्षापूर्वीपर्यंत साधू होते. अगदी लहानपणीच त्यांनी साधुपणाची दीक्षा घेतली होती. मात्र त्यांच्या आजीची प्रकृती अतिशय बिघडल्यानंतर त्यांनी मठ सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर ते फुटबॉल संघाचे कोच बनले. रविवारी सहा जणांना गुहेतून बाहेर काढण्यात आले, आणि सोमवारी दोन.

गुहेतून सुटका केलेल्या मुलांना हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना मीडियपासून दूर ठेवण्यात आले आहे. आज आणखी पाच जणांची सुटका करण्यात आल्याने मोहीम पूर्णपणे सफल झाली आहे. सर्वांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले आहे. दोघांना न्यूमोनिया झाल्याची शंका असून त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार चालू असल्याची माहिती बचाव मोहीम प्रमुख नारोंगसाक असोतानाकोर्न यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button