breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानातील निवडणुकीत 16.7 लाख मते बाद

इस्लामाबाद (पाकिस्तानात): पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत 16.7 लाख मते बाद झाली आहेत. पाकिस्तान निवडणुक आयोगानेच ही माहिती दिली आहे. पाकिस्तान निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात 10 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी जेमतेम निम्म्या, म्हणजे 51 टक्‍के मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. मतदान केलेल्यांपैकी अनेकांनी मतदान करताना चुका केल्या. काहींनी एकापेक्षा अधिक पक्षांच्या उमेदवारांच्य नावांसमोर शिक्‍का मारला. त्यांची मते बाद झाली. या वेळी झालेल्या मतदानात 16.7 लाख मते बाद झालेली आहेत. गेल्या वेळच्या म्हणजे 2013 च्या निवडणुकीतील बाद मतांपेक्षा यावेळी बाद झालेल्या मतांची संख्या 11.7 टक्‍के अधिक आहे.
बाद झालेल्या मतांचे प्रमाण बलुचिस्तानात सर्वात जास्त आहे. बलुचिस्तानात 40 टक्के मते बाद ठरली आहेत. त्या खालोखाल 30.6 टक्के मते खैबर पख्तुनवा प्रांतात बाद झालेली आहेत. पंजाब आणि सिंध प्रातांत बाद झालेल्या मतांच्या संख्येत अनुक्रमे 6.6 टक्के आणि 7 टक्के वाढ झालेली आहे. या वेळी मतदानात गडबद झाल्याची तक्रार बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button