breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

…म्हणून मुख्याध्यापिकेंनी ११ वर्षाच्या मुलाला लोखंडी रॉडने केली मारहाण

डेहराडून :  शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाच्या दर्जाबद्दल तक्रार केली म्हणून मुख्याध्यापकांनी ११ वर्षाच्या मुलाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना डेहराडूनमध्ये घडली आहे. मुख्याध्यापिकेच्या  मारहाणीत मुलगा जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डेहराडूनमधील जुन्या दळनवाला भागातील सरकारी शाळेत पीडित मुलगा पाचवीच्या वर्गात शिकत होता. राहुल असं विद्यार्थ्याचं नाव आहे. नसरिन बानो असं मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेचं नाव आहे. राहुलच्या तक्रारीमुळे चिडलेल्या मुख्याध्यापिकेने राहुलला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणीमुळे राहुल बेशुद्ध पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, राहुलच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button