breaking-newsताज्या घडामोडी

पंढरपूरात श्री विठ्ठल आणि रुख्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शाही विवाह संपन्न…

आज पर्यंत अनेक विवाह सोहळे झाले,होतील . पण जर देव देवतेचा विवाह असेल तर…असाच एक शाही विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुख्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता,सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळी उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला.

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुख्मिनिचा विवाह झाला होता असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहलेल्या रुख्मिणी स्वयंवरात केला आहे.हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाज करीत होते. त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहे. हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगेबिरंगी फुलांनी सजविले होते.सकाळी श्री विठ्ठल आणि रुख्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुख्मिणी मातेस मोत्याचे दागिने,नथ,हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले.

साधारणता सकाळी अकरा वाजता रुख्मिनिमातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला जातो. तिथे गुलालाची उधळण होते. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुख्मिनिमाते कडे घेवून जातात. तिथेही गुलालाची उधळण होते. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुख्मिणीचे अलंकाराने सजविलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली जाते. दोघानाही मंडावळ्या बांधून आणल्या जातात. यानंतर अंतरपाट धरला जातो.उपस्थितीताना फुल आणि अक्षता वाटप केले जाते आणि मग सुरु होतात मंगलाष्टका. आता सावध सावधान … हि मंगलाष्टक म्हणल्यावर सर्व उपस्थित टाळ्या वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या जयघोषात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा पूर्ण करतात. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,मंदिर समितीचे सदस्य यांच्यासह हजारो भाविक या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

वास्तविक पाहता शिशिर ॠुतु म्हणजे थंडी संपून वसंत ॠुतु म्हणजे उन्हाळा सुरु होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतू च्या आगमनाने सर्व सृष्टी फुलून जाते.सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार होते . आजचा दिवस रती आणि कामदेवाच्या पूजेचा असल्याच मानल जाते.वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टीमध्ये चैतन्य आल्याचाच हे प्रतिक आहे.या ॠुतु मध्ये पांढरे वस्त्र परिधान केले तर उन्हाची तीव्रता कमी होते. म्हणजेच विज्ञाना ची जोड पूर्वी पासून होते.हा विवाह सोहळा झाल्यावर सांयकाळी दोन्ही मूर्तीची नगरामधून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली.असे असले तरी वारकरी सांप्रदायात अनेक परंपरा आजही जपल्या जात आहेत.

वसंत पंचमी निमित्त मंदिरास फुलांनी सजवले आहे. श्री विठ्ठल आणि रूख्मिणीमातेचे गर्भगृह आणि प्रवेशद्वार येथे आकर्षक फुलांने सजवली होते. या विवाह सोहळ्यास मराठवाडा,कोकण येथील भाविक उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button