breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली.

उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरू असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पाहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात दाट धुके पाहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून दाट धुक्यामुळे येथील जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button