breaking-newsपिंपरी / चिंचवड

पवन शहा यांची 19 वर्षाखालील भारतीय किक्रेट संघात निवड

पिंपरी – संभाजीनगर येथील पवन शहा याची एकोणीस वर्षाखालील गटात भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सांगवी येथील आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, सरचिटणीस प्रमोद निसळ, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सागर आंगोळकर आदी उपस्थित होते. पवन शहा याच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातून विशेष कौतुक केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button