breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना जलवाहिनीच्या पाण्याबाबत सह शहर अभियंत्याचे ‘नो कमेंट्स’

बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत पाणीपुरवठा विभागात शिजतय काय?

शेतक-यांसाठी समांतर जलवाहिनी होणार का? यावर अधिका-यांची चूप्पी?

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहराचा महत्वकांशी असलेला पवना जलवाहिनी प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येवू लागली आहे. त्याकरिता जून्याच सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. तसेच पुर्वीच्याच ठेकेदाराने केलेल्या कामाची हिशोब पुर्ण करुन त्यांच्याकडून हे काम पुर्ण केले जाणार आहे. मात्र, या प्रकल्पाला मावळातील शेतक-यांचा आजही विरोध आहे. या प्रकल्पाबाबत मी कोणतीही माहिती देणार नाही. अशी भूमिकाच पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी घेतली असून पवना जलवाहिनी प्रकल्पावर त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर देवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

तब्बल नऊ वर्षानंतर पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाने संपुर्ण तयारी सुरू केली असून, सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात येवू लागला आहे. त्या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून युनिटी कन्सलटन्ट (युनिटी आय ई वर्ल्ड) नेमणूक केल्यानंतर प्रकल्पाच्या नियोजनबाबत बैठकाना वेग येवू लागला आहे. तसेच पूर्वीच्याच ठेकेदाराने या प्रकल्पाचे काम करण्यास काही अटी व शर्तींवर तयारी दर्शवल्याने सदरील सध्यस्थितीच्या बाजाराभावानूसार कामाचा आराखडा बनविण्यास सुरुवात केली आहे.  

पवना धरणातून निगडी प्राधिकरण सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. त्याकरिता तब्बल अठराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन समांतर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. संयुक्त भागीदारीत ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी विरोध करीत ऑगस्ट 2011 मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून काम बंद होते. तसेच या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री व जिल्हाधिका-यांचा जैसे थे आदेश आहे. तरीही महापालिकेकडून आता काम पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरु करुन सल्लागार कंपनीकडून आराखडा बनविण्यास सुरुवात केलेली आहे.

दरम्यान, बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पासह समांतर जलवाहिनीबाबत काय झाले. शेतक-यांना पवना नदीवर बंधारे बांधून देण्याविषयी सध्यस्थिती काय आहे. बंदिस्त पाईपलाईननंतर धरणात शहरासाठी पाण्याच्या आरक्षणात किती टक्के वाढ राहणार आहे. पाईपलाईन टाकण्याच्या मार्गावर भूसंपादन किती झालं आहे. जून्या पाईप गोळा करण्यासाठी 80 लाखांचे झालेल्या टेंडरची सध्यस्थिती काय आहे. यासह आदी प्रश्नांची सरबत्ती सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्याकडे करण्यात आली. परंतू. त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पवना जलवाहिनीवर त्यांनी केवळ नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया देवून प्रकल्पाची माहिती दडवण्याचा प्रयत्न करु लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button