breaking-newsमुंबई

परळ टर्मिनसचे आज रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सध्या प्रभादेवी नाव असलेल्या पूर्वीच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर वेगाने विकसित करण्यात आलेले परळ टर्मिनस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या टर्मिनसचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर टर्मिनसमध्ये करण्यात आले आहे.

परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांची लोकल चालविण्यात येणार आहे. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. कल्याण दिशेकडे १६ फेऱ्या आणि परळ दिशेकडे १६ फेऱ्या अशा एकूण ३२ फेºया चालविण्यात येणार आहेत. कल्याणहून परळ टर्मिनसकडे सकाळी ७ वाजून ९ मिनिटांना रवाना होणार आहे. तर शेवटची लोकल कल्याणहून ९ वाजून ५२ मिनिटांला परळ टर्मिनसकडे रवाना होणार आहे.

कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत आणि टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल फेर्‍या परळ टर्मिनसवरून सुटणार आहेत. मध्य रेल्वे परळ टर्मिनसवरून सुटणार्‍या लोकल सेवांमुळे दादर रेल्वे स्थानकावर येणारा भार नक्कीच कमी होणार आहे. दादरहून सुटणार्‍या सुमारे 50 टक्के लोकल परळ उपनगरीय टर्मिनसवरून सुरू करण्याचा विचार आहे, त्यामुळे दादरमधील गर्दी बर्‍यापैकी कमी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button