breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप शिष्टमंडळाने परदेश दौ-याचा अहवाल मांडावा – सचिन साठे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर, आयुक्तांबरोबर विरोधी पक्षनेत्यासह गटनेते देखील सहभागी झाले आहेत. बार्सिलोना येथे आयोजित केलेल्या ‘स्मार्ट सिटी चर्चासत्र’ संपुण चार दिवस झाले तरी अद्याप शिष्टमंडळातील सर्व प्रतिनिधी शहरात आलेले नाहीत. महापालिकेच्या खर्चाने होणारे असले खर्चिक परदेश दौरे म्हणजे नागरिकांच्या पैशावर टाकलेला सामुहिक दरोडाच आहे. या दौ-यातून काय निष्पन्न झाले याचा सविस्तर अहवाल महापौर, विरोधी पक्षनेते, सहभागी गटनेते, आयुक्त व संबंधित अधिका-यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

महापालिकेचे एकविस लाख रुपये खर्च करुन बार्सिलोना येथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटीच्या चर्चासत्रासाठी  महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षनेते एकनाथ पवार, गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, सह शहर अभियंता राजन पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह दहा प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले आहे. चर्चासत्र संपुण चार दिवस झाले, तरी अद्यापही शिष्टमंडळाचे सर्व प्रतिनिधी शहरात आलेले नाहीत. वस्तु:ता विरोधी पक्षाने व इतर गटनेत्यांनी शहरातील नागरीकांना भेडसावणा-या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला पाहिजे, असे साठे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर अनावशक खर्चिक प्रकल्पांवर जनतेच्या पैशाची लूटमार करीत असते तेंव्हा विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करुन अशी चुकीची कामे थांबविण्यासाठी सत्ताधा-यांना भाग पाडले पाहिजे, अशी नागरीकांची अपेक्षा असते. परंतू, या दौ-यात सत्ताधा-यांबरोबरच विरोधी पक्ष देखील सहभागी झाल्यामुळे विरोधकांबाबत देखील अपेक्षाभंग झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अवघ्या दिड वर्षांत पदाधिकारी व अधिका-यांनी मनपाच्या खर्चाने देश परदेशात सोळा दौरे करुन ‘पर्यटनाचा आनंद’ उपभोगला. यापैकी एकाही दौ-याचा अहवाल सभागृहात मांडलेला नाही. बार्सिलोना दौ-यातील अहवाल आणि यापुढे मनपाचे लोकप्रतिनिधी व अधिकारी नागरीकांच्या पैशाने देश परदेशात दौ-यावर गेले, तर त्या दौ-याची फलनिष्पत्ती काय झाली याचा सविस्तर अहवाल पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा, अशीही मागणी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button