breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदिवासी संस्कृतीमधील चांगल्या गोष्टींनी समाजाची प्रगती होईल – आमदार जगताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आदिवासी संस्कृतीमध्ये असणा-या चांगल्या गोष्टी समाजाला देण्याचे कार्य केल्यास अशा उपक्रमाने समाजाची मदत होईल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत शुक्रवार (दि. २३) ते रविवार (दि.२५) दरम्यान आदिवासी संगीत, संस्कृती व खाद्य दर्शन कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळील क्रिडांगणावर करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन समारंभात आमदार जगताप बोलत होते. यावेळी जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, “ह” प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य सागर आंगोळकर, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, गावाकडून खूप आदिवासी लोक शहरात येतात. त्यांना तुमचा आधार वाटतो, असाच तुमचा आधार वाटत राहावा आणि आपल्या आदिवासी बांधवाना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, यासाठी लोकप्रतिधींनी प्रयत्न करावे. आदीवासींसाठी शासन खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवित असते, अशा योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहचविल्या पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतची पुस्तिका शासन दरबारी उपलब्ध आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच ख-या अर्थाने समाज पुढे जाईल. असेही ते यावेळी म्हाणाले.

कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी शोभा यात्रेने झाली. त्यानंतर आदिवासी तारपा नृत्यकला सादर करण्यात आली. तूरनाच नृत्य व शिवसह्याद्री ढोल पथकाचे सादरीकरण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसदस्य भाऊसाहेब सुपे यांनी केले.  तर, सूत्रसंचलन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button