breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

खळबळजनक! हैदराबाद बलात्कारानंतर पुन्हा हादरला देश, 14 वर्षीय मुलीने विरोध केला म्हणून जिवंत जाळलं

बेमेतारा: हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आज देश पुन्हा एकदा हादरलेला आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्यानं दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडलेला आहे. यामध्ये पीडित मुलगी 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. आरोपी पीडित विद्यार्थ्यीनीच्या शाळेतीलच वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मृत्यूपूर्वी पीडित विद्यार्थीनीने गावातील दोन तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. बेमेतारा जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या 22 तारखेला जिल्ह्यातील दाढी पोलीस स्टेशन भागात दोन तरुणांनी मुलीला जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मुलीला रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दोन आरोपींनी पीडितेच्या घराजवळच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्यांना चोख उत्तर दिलं आणि पळ काढला. पण यावेळी आरोपींनी पीडितेवर तेल ओतून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button