Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण : मुख्य आरोपी देवडीकरला ठोकल्या बेड्या

दिल्ली | महाईन्यूज

गौरी लंकेश हत्याप्रकरणी मुख्य आरोप ऋषिकेश देवडीकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मूळचा औरंगाबादचा असलेल्या ऋषिकेश देवडीकरला विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून बेड्या ठोकलेल्या आहेत. ऋषिकेश गेल्या अनेक दिवसांपासून फरार झालेला होता. ऋषिकेश देवडीकरला आज, शुक्रवारी धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत आणून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी तब्बल आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button