breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

पती आणि दोन मुलांची इंजेक्शन देऊन हत्या, महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपुरात खळबळ

नागपूर | प्राध्यापक पती, मुलगा आणि मुलीची इंजेक्शन देऊन हत्या केल्यानंतर डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. राणे कुटुंबात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरमधील कोराडी भागात असलेल्या ओमनगर जगनाडे लेआऊटमध्ये काल दुपारी ही घटना उघडकीस आली. 42 वर्षीय धीरज दिगंबर राणे, 39 वर्षीय पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे, 11 वर्षीय मुलगा ध्रुव धीरज राणे आणि पाच वर्षांची मुलगी लावण्या धीरज राणे यांचे मृतदेह आढळले होते.

डॉ. सुषमा राणे यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं, तर पती आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर होते. सुरुवातीला दाम्पत्याने मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु डॉक्टर पत्नीने पती आणि मुलांची इंजेक्शन देऊन हत्या केल्यानंतर गळफास घेतल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभाग प्रमुख होते, तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. त्यामुळे डॉ. सुषमा राणे यांनी पती व मुलांची हत्या करुन आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राणे दाम्पत्यासोबत धीरज यांची 65 वर्षीय आत्या राहते. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी आवाज दिला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्रमिला यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवून खोलीचा दरवाजा उघडला असता धीरज, ध्रुव व लावण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले तर पंख्याला डॉ. सुषमा गळफास लावलेल्या स्थितीत दिसल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button