breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंधरा ऑगस्टला शिवसेना निगडीतील राष्ट्रध्वज फडकविणार – आमदार गौतम चाबुकस्वार

 

पिंपरी – निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आलेला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज कोणत्या न कोणत्या कारणावरून खाली उतरविण्यात येत आहे. हा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप अपयशी ठरले आहे. येत्या पंधरा ऑगस्ट रोजी झेंडा कायमस्वरुपी फडकवत ठेवला नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतः झेंडा फडकवतील,  असा इशारा आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी दिला आहे.

 

महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे भक्ती-शक्ती चौकातील तिरंगा मागील अनेक दिवसांपासून फडकविला जात नाही. याबाबत शिवसेनेने भक्ती शक्ती चौकात निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार चाबुकस्वार महापालिकेतील सत्ताधारी भजापवर टिका केली. यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, जितेंद्र ननावरे, युवराज दाखले आदी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने येत्या 15 ऑगस्टला झेंडा कायमस्वरूपी फडकवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने निगडी पोलिसांना देण्यात आले. हे निवेदन निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड, तात्या तापकीर यांनी स्वीकारले.

 

आमदार चाबुकस्वार म्हणाले, राज्यघटनेत ठराविक उंचीचा झेंडा सतत फडकवत ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी घाईघाईने हा झेंडा फडकविला आहे. एकदा फडकविलेला झेंडा वारंवार उतरवला जात आहे. यातून सत्ताधा-यांना राष्ट्रध्वजाबद्दल आस्था नसल्याचे स्पष्ट होत आहे. जर सत्ताधारी हा झेंडा फडकविण्यास असमर्थ असतील तर शिवसेना हा झेंडा डौलाने फडकविणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button