breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौ-याची जोरदार तयारी

मुंबई : साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला येत आहेत. पंतप्रधानांच्या दो-याची गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिस प्रशासन व इतर यंत्रणांकडून जय्यत तयारी सुरू आहे. तब्बल तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त शिर्डीत लावण्याचे नियोजन पोलिस प्रशासनाने केलेले आहे. त्याचबरोबर त्या दिवशी शिर्डीतील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात उपस्थित राहणा-या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राज्य सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने उभारलेल्या दोन लाख घरकुलांपैकी चार जिल्ह्यातील लाभार्थींना प्रतिनिधीक स्वरूपात घरकूल वाटप होईल. भाविकांसाठी नव्याने बांधण्यात येणा-या दर्शनरांग प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, विविध खात्याचे मंत्रीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. १९ ऑक्टोबरला सकाळी विशेष विमानाने पंतप्रधान यांचे शिर्डी विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून कारने साई मंदिरात दर्शनाला येतील, असे नियोजन आहे. दौ-याच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व इतर विभागाच्या अधिका-यांच्या महत्त्वाच्या बैठकीत शिर्डीत होत आहे. सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आयबीचे एक पथकही शिर्डीत मुक्कामी आहे. आयबीबरोबर इतर सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी शिर्डीत आहेत.

पंतप्रधान दौ-यामुळे शिर्डीत तीन हजार पोलिस कर्मचारी, तीनशे पोलिस अधिकारी असा बंदोबस्त असणार आहे. एक हजारहून अधिक पोलिस कर्मचारी, काही अधिकारी जिल्ह्याबाहेरून बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले आहेत. आतापासून शिर्डीमध्ये नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. साई मंदिराकडे येणारे काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button