breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन

सोलापूर | पंढरपूर येथील भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण उर्फ वा. ना. उत्पात यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

वा. ना. उत्पात यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यांनी विठ्ठल मंदिरात 25 वर्षे श्रीमदभागवत कथा आणि रुक्मिणी स्वयंवर कथेचे वाचनही केले. वासुदेव नारायण हे हिंदुत्वावादी विचारसरणीसाठी ओळखले जात होते. त्यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास होता. त्यांनी सावरकर साहित्याचा प्रसारही केला.

सावरकरांच्या विचारांचे साहित्य संमेलन सुरु करण्याची संकल्पनाही वासुदेव नारायण यांनीच मांडली. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषवले होते. वा. ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण आणि आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नावांपैकी एक नाव आहे. त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही भुषविले होते. शिवाय ते पंढरपुरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘पंढरपूर एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष देखील होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button