breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पंकजा मुंडे यांनी कलात्मक पद्धतीने श्रीरामाच्या चरणी केलं वंदन

प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे आज 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण या आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. प्रत्येकानं आपल्या-आपल्या पद्धतीनं हा आनंद सोहळा साजरा केला आहे. त्याचप्रमाणं पंकजा मुंडे यांनी देखील कलात्मक पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. त्यांनी स्वतः श्रीरामाचे चित्र साकारत त्यांना कलात्मक पद्धतीने नमन केलंय.

अयोध्येत श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर असावे”, या इच्छेला पूर्णत्वास नेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समस्त देशवासीयांचे स्वप्न या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतांना पंकजा मुंडे यांनी आपली श्रद्धा प्रकट केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत पंकजा यांनी आपला चित्रकलेचा छंद जोपासला आहे.

श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार्श्वभुमीवर पंकजा मुंडेंनी आपल्या भावविश्वातील प्रभु श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय चित्र साकारले आहे. या माध्यमातून भुमीपुजन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून या चित्राखाली “Trying to put my trust through brush to bow down to the maryada purushottam “shree ram”.. big day ..”असे लिहिले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button