breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड शाळेत अब्दुल कलाम यांना अभिवादन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा दिवस” साजरा करण्यात आला.

शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाबिश, आनद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, सुमित आखाडे, राजकुमार खोत यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते .

यावेळी शाळेच्या दर्शनी भागात वाचन प्रेरणा दिनाचे भित्ती पत्रक लावण्यात आले होते. मुलांना वाचन कट्टा, पुस्तकपेढी, पुस्तक वाचन संकल्प, पुस्तकाचे प्रदर्शन या संदर्भात मान्यवरांनी मागर्दर्शन केले. वाचन स्पर्धा व विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी मुलांना जेवण्याच्या आधी व काहीही गोष्टी खाण्या अगोदर स्वच्छ  हात धुणे, शौचालयाला गेल्यानंतर, खोकला जोरात आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे आदींबाबत मागर्दर्शन करण्यात आले. यामुळे डायरिया व कावीळ  यासारखे आजार न होण्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. संविधानातील प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा शेलार यांनी केले. तर, आभार प्रियांका लाडे यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button