breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये महिला दिन साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. 

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, डॉ. भीमराव सरवदे, शेखर मामर्डे, शशिकांत शेलार, पुरुषोत्तम गाणार, शिनगारे, राहुल गायकवाड, प्रवीण चरडे, शिक्षक व शिक्षकत्तोर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. महिला शिक्षक कर्मचा-यांच्या हस्ते सरस्वती पूजन  करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षिकांना पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी “आजच्या युगातील स्त्री” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात स्त्रिया कश्या आघाडीवर आहेत. याविषयावर भाषण केले. 

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, “आताच्या महिलांनी चूल व मुल ह्यातच न रहाता शिक्षित झाले पाहिजे. जर, एक मुलगी शिक्षित झाली तर पूर्ण कुटुंब व पुढची पिढी शिक्षित होईल. मुलगा मुलगी असे भेदभाव न करता मुलींनाही समान वागणूक दिली पाहिजे, तरच खऱ्या अर्थांनी महिला दिन साजरा केल्यासारखे होईल”.   

“भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे असेही चाबुकस्वार म्हणाले.

राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुलेंची साथ होती म्हणून जोतिबा फुले महात्मा झाले. इतकेच नव्हे, तर कौसल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देवप्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहेत, असे चाबुकस्वार यांनी शेवटी सांगितले.

महिला दिनाचे औचीत्य साधून “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानाचे महत्व पटऊन दिले. उत्कर्षा पाटील यांनी आभार मानले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button