breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करदात्यांच्या सुविधेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने बॅंक बदलली

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधांमुळे येस बॅंकेची ऑनलाइन यंत्रणा बंद झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने करदात्यांच्या सुविधेसाठी बॅंक बदलली. आता मिळकत कर, पाणीपट्टी आदी कर भरण्याची सुविधा बॅंक ऑफ बडोदामध्ये सुरू केली आहे.

महापालिकेने ऑगस्ट २०१८ मध्ये येस बॅंकेत खाते उघडले होते. तेव्हापासून वसूल होणारी दैनंदिन रक्कम येस बॅंकेत जमा व्हायची. हिंजवडी, वाकड परिसरातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून असंख्य नागरिक ऑनलाइन यंत्रणेचा वापर करायचे.

महापालिकेने येस बॅंकेतील ‘ट्रान्झॅक्‍शन’ गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून थांबविले. त्याऐवजी बॅंक ऑफ बडोदामध्ये भरणा करण्यास सुरवात केली आहे, मात्र ऑनलाइन सुविधा सुरू झालेली नाही. यासंदर्भात पालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सांगितले की, ‘‘बॅंक ऑफ बडोदाच्या ऑनलाइन सुविधा पाहणाऱ्या पथकाला पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात बोलविण्यात आले आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागतो.’’

…म्हणून येस बॅंकेत खाते
ज्या खासगी बॅंकेचे नक्त मूल्य चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असते, अशा बॅंकेत सरकारी संस्थेला खाते उघडता येते. तशा आशयाचा २०१५ मधील राज्य सरकारचा अध्यादेश आहे. त्यानुसारच महापालिकेने २०१८ मध्ये येस बॅंकेत खाते उघडले होते, असे कोळंबे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button