breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

न्यूड फोटोशूट प्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल

पणजी – फिटनेस फ्रिक आयर्नमॅन मिलिंद सोमण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर नग्न फोटोशूट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. त्याने हा फोटो सोशल मीडियावरही प्रसिद्ध केला होता. मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिलिंद सोमणने ४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ५५ व्या वर्षात पदार्पण केले. स्वत:लाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केलं होतं. तसेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून ते प्रसिद्धही केलं होतं. ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली.

‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतिमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अश्लिल व्हिडीओचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button