Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेला आणखी एक धक्का;आमदार, खासदार झाले आता शिंदेंच्या पाठिशी

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील शेकडो नगरसेवक पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक ही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला असून या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आहेत. एकनाथ शिंदे यांना जवळपास पन्नास आमदारांचा पाठिंबा घेऊन गुवाहाटी येथे हॉटेल रेडिसन ब्लू येथे वस्तीला आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष हे राजकीय परिस्थिती काय होणार याकडे लक्ष ठेवून आहे.
केडीएमसी मध्ये एकूण ५३ नगरसेवक हे शिवसेनेचे मागच्या निवडणुकीत निवडूण आले होते. यातील ३ नगरसेवक यांचे निधन झाले. तर येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता सुमारे ३५ नगरसेवक हे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीमधील आहेत आणि संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे कल्याण लोकसभेतील कळवा, मुंब्रा, दिवा, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरामधील नगरसेवक संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बदलापूर नगरपालिकामधील नगरसेवक आणि ग्रामीण भागातील जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत मधील सदस्य हे शिंदे यांच्या मर्जीतील आणि संपर्कात आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button